yuva MAharashtra रामानंदनगरसह संबंधित गावांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरळीत पाणी द्या! ; कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस पंचायत समितीला निवेदन

रामानंदनगरसह संबंधित गावांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरळीत पाणी द्या! ; कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस पंचायत समितीला निवेदन





पलूस दि. ०७ : रामानंदनगरसह संबंधित गावांना तातडीने स्वच्छ, शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे तसेच दूषित पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर (भैय्या) पठाण यांच्या नेतृत्वाखाली पलूस पंचायत समितीकडे निवेदन देण्यात आले.



कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत वारंवार लिकेज होत असल्याचे कारण सांगून पाणीपुरवठा बंद केला जातो. परिणामी रामानंदनगरसह परिसरातील गावांना अनेकदा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. काही दिवस पाणीपुरवठा झाल्यानंतरही दूषित पाणी येत असल्याने ते पिण्यास योग्य नसल्याचा संदेश नागरिकांना दिला जात असल्याने नागरिकांची पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.


या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पलूस पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. लिकेजची कारणे दूर करून पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करावा आणि नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.


पलूस पंचायत समितीच्या वतीने टी.पी.ओ. खाडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनाची दखल घेत कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील लिकेजची कामे लवकरात लवकर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत रामानंदनगर गावाला तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले.


यावेळी सावंतपूर गावचे तंटामुक्ती समिती सदस्य हरीष (भाऊ) वडार, अमन पठाण, आजान जमादार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मामी कुंभार, रुकसाना मुलानी, आशा गायकवाड माई, रेणुका मिरेकर, दिव्या मोहिते, वंदना कांबळे, नाझिया पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी सुरळीत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰