भिलवडी दि. १३ : भिलवडी (ता. पलूस) परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भिलवडी पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल पाच जणांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मिळालेल्या पोलीस माहितीनुसार, गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजून २० मिनिटांच्या सुमारास भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौलानानगर परिसरात, मशिदीच्या पाठीमागे सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या बांबळीच्या बनात आडोशाला काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी पाच जण जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत पकडण्यात आलेल्या पाच जणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) राहुल प्रमोद कसबे (वय ४०, रा. विकासनगर, सातारा)
२) माणिक तुकाराम सरगर (वय ३८, रा. मौलानानगर, भिलवडी)
३) उमाजी नाना चव्हाण (वय ३८, रा. वसंतदादा नगर, भिलवडी)
४) रोहित आलिसाब शेख (वय ३७, रा. मौलानानगर, भिलवडी)
५) लखन बाबन वायचंडे (वय ३५, रा. माळवाडी, ता. पलूस)
या कारवाईत पोलिसांनी रोख १ हजार ८० रुपये आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे दोन पत्त्यांचे कॅट असा मुद्देमाल जप्त केल्याची नोंद आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२ (अ) अन्वये भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार इनामदार यांनी फिर्याद दिली असून, पोलीस कॉन्स्टेबल माळी यांनी तपास केला आहे.
भिलवडी परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अशाच स्थानिक आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा...
द जनशक्ती न्यूज!
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


