yuva MAharashtra जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी - मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज - जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी - मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज - जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान



 

        सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 निवडणूक विभाग व 10 पंचायत समितीच्या 122 निर्वाचन गणांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सरासरी 69.76 टक्के इतके मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर  122 फेऱ्यांमध्ये होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

 

            मतमोजणीसाठी तालुकानिहाय टेबल संख्या व फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे. आटपाडी - 18 टेबल, 12 फेऱ्या, जत – 27 टेबल, 13 फेऱ्या, खानापूर – 16 टेबल, 9 फेऱ्या, कडेगाव – 16 टेबल, 11 फेऱ्या, तासगाव – 20 टेबल, 12 फेऱ्या, कवठेमहांकाळ – 16 टेबल, 9 फेऱ्या, पलूस – 14 टेबल, 9 फेऱ्या, वाळवा – 22 टेबल, 19 फेऱ्या, शिराळा – 20 टेबल, 9 फेऱ्या, मिरज – 22 टेबल, 19 फेऱ्या.

 

            तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – आटपाडी – पहिला मजला हॉल नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी. जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत. खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा. कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव. तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव, दत्तमाळ. कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ. पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, दिवाणी न्यायालयाजवळ, पलूस. वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर. शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा. मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.

 

तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे -

 

अ.क्र.

तालुका

निवडणूक

विभाग

निर्वाचन

गण

एकूण मतदार

झालेले मतदान

पुरूष

स्त्री

इतर

एकूण

पुरूष

स्त्री

इतर

एकूण

टक्के-वारी

1

आटपाडी

61738

59372

4

121114

45894

43013

4

88911

73.41

जत

१८

140188

127300

1

267489

95231

85035

0

180266

67.39

खानापूर

57449

57002

3

114454

38626

38388

3

77017

67.29

कडेगाव

67141

68443

3

135587

49645

47364

2

97011

71.55

तासगाव

१२

96621

92988

5

189614

65638

60205

2

125845

66.37

कवठेमहां-काळ

63423

61748

0

125171

43136

39395

0

82531

65.93

पलूस

62493

62148

2

124643

48403

46009

1

94413

75.75

वाळवा

११

२२

151788

147048

3

298839

115560

107685

3

223248

74.71

शिराळा

 

70654

68483

2

139139

49564

48105

2

97671

70.20

१०

मिरज

११

२२

152426

150249

19

302694

105045

96874

9

201928

66.71

एकूण

६१

१२२

923921

894781

42

1818744

656742

612073

26

1268841

69.76

 

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰