yuva MAharashtra जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 मतदान, मतमोजणीच्या अनुषंगाने मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 मतदान, मतमोजणीच्या अनुषंगाने मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद



 

        सांगली, दि. 6 (जि. मा. का.) : सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज या पंचायत समित्यांकरिता दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान व दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत तसेच निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम १४२ अन्वये संबंधित निर्वाचन क्षेत्रातील सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-१. एफएल-२, सीएलएफएल/टीओडी-३, एफएल ३. एफएल/बीआर-२. सीएल-२. सीएल-३, फॉर्म-ई, फॉर्म ई-२. एफएल-४, टीडी-१) पुढीलप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

 

            सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज पंचायत समिती कार्यक्षेत्रात (सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, सर्व नगरपंचायत व नगरपरिषद कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 6 फेब्रुवारी 2026 (मतदानाच्या अगोदरचा दिवस) व दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी (मतदानाचा दिवस) संपूर्ण दिवस बंद राहतील. तर दिनांक 9 फेब्रुवारी 2026 मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण सांगली जिल्हा कार्यक्षेत्रात संपूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 नुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल,  असे आदेशात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰