yuva MAharashtra पलूस-कडेगाव तालुक्याचे नेते, प्रदीपआप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रंगला ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ ; आमिरभैय्या पठाण यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पलूस-कडेगाव तालुक्याचे नेते, प्रदीपआप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रंगला ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ ; आमिरभैय्या पठाण यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद



पलूस दि. ०७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आमिरभैय्या पठाण यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी, रामानंदनगर यांच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम जोरदार रंगला. 



विविध सामाजिक व मनोरंजनात्मक राबविण्यात आले. तेजस्विनी शहा प्रस्तुत ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’, तसेच भव्य रांगोळी व चित्रकला स्पर्धेला महिला आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संपदा शिंदे यांनी केले.


‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’मध्ये सौ. पौर्णिमा स्वप्निल शिंदे यांनी प्रथम क्रमांक, सौ. सोनाली चंद्रकांत जाधव यांनी द्वितीय क्रमांक, तर सौ. श्यामला गावडा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच लकी ड्रॉमधून शोभा शिंदे, हाफीजा पटेल, गिताली मोरे, श्रेया कदम आणि दिपाली सुतार या पाच विजेत्यांची पैठणीसाठी निवड करण्यात आली.



दरम्यान, आमिर भैय्या पठाण यांच्या नेतृत्वाखाली रामानंदनगर येथे भव्य रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. महिला अत्याचार, मोबाईलचे दुष्परिणाम, स्त्रीशक्ती आदी सामाजिक विषयांवर आधारित रांगोळ्या स्पर्धकांनी साकारल्या. यामध्ये सुप्रिया अब्दुल रजाक मुल्ला यांनी प्रथम क्रमांक, विशाखा आतिश पाटील यांनी द्वितीय क्रमांक, तर पूजा धन्यकुमार सुतार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


याशिवाय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्पर्धेत देविका सूर्यकांत जाधव यांनी प्रथम क्रमांक, महेेरा मोहम्मद हुसेन जमादार यांनी द्वितीय क्रमांक, तर आरोही विशाल भांडवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.



या विविध उपक्रमांमुळे रामानंदनगर परिसरात प्रदीपआप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक संदेश, महिलांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.



या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सौ. सरिता कुंभार, आशा गायकवाड माई, महिला तक्रार समितीच्या रुक्साना मुलाणी, सौ. मंजिरी शिंदे, रेणुका मिरेकर, सौ. दिव्या मोहिते, आयेशा मुल्ला, सौ. प्रगती यादव, सौ. परविन इनामदार, राणी ताई माने, तसेच सावंतपूर गाव तंटामुक्ती समितीचे सदस्य हरीष वडार, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मिठारी, बाबासाहेब इनामदार, नारायण पाटील सर, झाकीर पटेल, जमीरखान पठाण, शाबाज नदाफ, राहुल इंगवले आदी उपस्थित होते.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰