yuva MAharashtra भिलवडी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा ; डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल मयुरी नलवडे यांचा विशेष सत्कार

भिलवडी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा ; डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल मयुरी नलवडे यांचा विशेष सत्कार



भिलवडी दि. 12 : सार्वजनिक वाचनालय, भिलवडी (ता. पलूस) येथे ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विवेकानंद वाचनालय, पलूसचे अध्यक्ष पांडुरंगजी पुदाले यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल मयुरी नलवडे यांचा ग्रंथ भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.



कार्यवाह सुभाष कवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "वाचन चळवळीमध्ये ग्रंथपालांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथपाल हा ग्रंथालय चळवळीचा महत्त्वाचा घटक असून उत्तम पुस्तकाला उत्तम वाचक आणि उत्तम वाचकाला उत्तम पुस्तक देण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रंथपाल करतात."

डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी देशात वाचन व ग्रंथालय चळवळीला व्यापक दिशा देत समाजाला वैचारिकदृष्ट्या सुसंस्कृत करण्याचा पाया घातला. गावोगावची वाचनालये गावांना वैचारिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे काम करतात. ग्रंथपालांमुळे गावांची वैचारिक समृद्धी वाढत असते, असेही सुभाष कवडे यांनी सांगितले.

कार्यक्रमास वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्या निकम यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर आभार कार्यवाह सुभाष कवडे यांनी मानले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰