yuva MAharashtra जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्या सांगली जिल्हा दौरा

जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्या सांगली जिल्हा दौरा



        सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : राज्याचे  जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवार, दि. 25 जुलै 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

            शनिवार दि. 25 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री. बिरोबा देवस्थान, आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ येथे आगमन व श्री. बिरोबा महाराज दर्शन तसेच शेतकऱ्यांसमवेत संवादाकरीता राखीव.  सकाळी 11 वाजता श्री. बिरोबा देवस्थान, आरेवाडी येथून मोटारीने वाघोली ता. कवठेमहांकाळकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता वाघोली येथे आगमन व टेंभू प्रकल्प (विस्तारीत टप्पा 5) च्या कामाच्या पाहणीसाठी राखीव,  सकाळी 11.30 वाजता वाघोली येथून मोटारीने भूड ता. खानापूरकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता भूड येथे आगमन व भूड वितरण हौद पाहणीसाठी राखीव. दुपारी 12.15 वाजता भूड येथून मोटारीने रायगांव ता. कडेगांवकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता रायगांव येथे आगमन व राखीव, स्थळ - माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे निवासस्थान. दुपारी 2.15 वाजता रायगांव येथून मोटारीने हरीपूर ता. मिरजकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता हरीपूर येथे आगमन व कोथळी पूल (बॅरेज साईट) पाहणीसाठी राखीव. दुपारी 4.30 वाजता हरीपूर येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथून  मोटारीने म्हैसाळ, ता. मिरजकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता म्हैसाळ येथे आगमन व म्हैसाळ बॅरेज पाहणीसाठी राखीव. सायंकाळी 6 वाजता म्हैसाळ येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

  🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰