भिलवडी दि. २३ : सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील बागणी येथील Gurukul Vidyaniketan या शाळेचा विद्यार्थी प्रसाद खंडेराव भिसे याने भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा (ITSE) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुळगाव भिलवडी (ता. पलूस ) येथील प्रसादने या परीक्षेत एकूण २०० पैकी १९६ गुण मिळवत आपल्या बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि मेहनतीची झलक दाखवून दिली. पेपर-१ मध्ये ९६ तर पेपर-२ मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवत त्याने उज्वल यशाची नोंद केली आहे.
प्रसाद खंडेराव भिसे
लहान वयातच मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे बागणी गावासह संपूर्ण वाळवा तालुक्यातून प्रसादवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे मोलाचे सहकार्य आणि स्वतःची जिद्द महत्त्वाची ठरली आहे.
प्रसादच्या या यशामुळे Indian Talent Search Examination परीक्षेत गुरुकुल विद्यानिकेतन शाळेचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून, शाळेचे संस्थापक अध्यक्ष , उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.
प्रसाद भिसे याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



