yuva MAharashtra २५ वर्षांची साहित्य- संस्कार सेवा ; ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांचा भिलवडीत गौरव

२५ वर्षांची साहित्य- संस्कार सेवा ; ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांचा भिलवडीत गौरव

 


भिलवडी दि. २४ : साने गुरुजी बाल कुमार संस्कार वर्ग, वाचन चळवळ आणि साहित्य चळवळीत गेली तब्बल २५ वर्षे सातत्याने सक्रिय योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री. सुभाष कवडे यांचा जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २३ मे रोजी विशेष सत्कार करण्यात आला.



साहित्य, संस्कार आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी श्री. कवडे यांनी अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्य केले आहे. बालकांमध्ये संस्कारमूल्ये रुजविणे, वाचनाची आवड निर्माण करणे तसेच साहित्य क्षेत्रात सातत्याने योगदान देणे या त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांचा सन्मान केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. सुभाष कवडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाचा गौरव केला. 


सत्काराला उत्तर देताना श्री. कवडे यांनी जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले व भविष्यातही सामाजिक व साहित्यिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰