yuva MAharashtra राज्य अन्न आयोगाचा सांगली जिल्हा दौरा संपन्न

राज्य अन्न आयोगाचा सांगली जिल्हा दौरा संपन्न

 






            ❤️ ERTIGA Facilities

                👇👇👇👇👇👇👇

➡️ Touchscreen infotainment system & MUSIC SYSTEM

➡️ AIR BAGS

 ➡️ CHILLED AC


 

        सांगली, दि 19 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य  रणजीत निंबाळकर यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हयामध्ये अन्न आयोगाचा तीन दिवसीय दौरा संपन्न झाला. हा दौरा

 

            या दौऱ्यादरम्यान पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अशा तिन्ही विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप, अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत 100% करणे, शालेय विदयार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार देणे तसेच अंगणवाडीतील गरोदर महिला, स्तनदा माता व बालकांना 100% आहार देणे, सांगली व मिरज शहरातील भिक्षेकरी, वेश्या व्यवसायातील महिला व बालके यांचा सर्व्हे शहरातील बाल विकास प्रकल्प अधिकारी व महसूल यंत्रणेने करुन त्यांना नियमानुसार शासनांच्या योजनांचा लाभ देण्याबाबत आयोगाने सुचना दिल्या, तसेच आरोग्य विभागाने पोषण पुनर्वसीत केंद्रात सर्व कुपोषीत बालकांना दाखल करण्यासाठी पालकामध्ये जाणीव व जागृती करावी. मातांना बुडीत भत्याचे वाटप करुन बालकांचे दाखल प्रमाणे वाढवावे अशा सुचना दिल्या.

 







            दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी समडोळी येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी सेविका व मतदनीस यांना आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी शाळा, अंगणवाडी यांना भेटी देवून आहाराची चव घेण्यात आली. लाभार्थ्याच्या भेटी घेऊन त्यांच्याशी आयोगाने लाभाबाबत हितगुज साधले. तासगाव येथील धान्य गोदामास भेट देऊन पहाणी केली.

 


            सदर दौऱ्यादरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण ) सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, शिक्षणाधिकारी (प्राथ) मोहन गायकवाड, नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी बुधावले व अमोल पाटील, जिल्हयातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पुरवठा निरिक्षक तसेच आयोगाचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक बबन मसाले, लिपिक सदावर्ते हे उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰