पलूस दि. ६ : सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधीत दैनंदिन प्रश्न सत्त्वर निकाली काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने पलूस तालुक्यात विविध शिबीरे आयोजित केली जात आहेत.
पलूस तालुक्यामध्ये जातीचे दाखले काढणे करती महसुली पुरावे व जुने अभिलेख आवश्यक असतात, त्या अनुषंगाने पलूस तहसिल कार्यालयात उपलब्ध असणारे मोडी भाषेतील कुणबी, इतर नोंदी वाचन व जुन्या कागदपत्राची शोध मोहिम, त्याचप्रामणे जातीचे दाखले काढणेकरीता आवश्यक असणारे मानीव दिनांकाचे सर्वसाधारण महसुली पुरावे यांचे शोध घेणेकामी मंगळवार दिनांक 09/09/2025 रोजी तहसिल कार्यालयमध्ये विशेष शिबीर आयोजित करणेत येत आहे.
तरी सदर शिबीरांमध्ये सर्व नागरिकांनी लाभघ्यावा. यासाठी आपले कडील दाखला काढणेकामी वंशावळ व मानीव दिनांकचा उपलब्ध पुरावा व अन्य उपलब्ध पुरावे सोबत घेवून यावे. जेणेकरून त्वरीत दाखले प्रस्ताव तयार करणेची कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन पलूसचे तहसिलदर दिप्ती रिठे यांनी केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


