भिलवडी दि. ०३ मे : भिलवडी ता. पलूस येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील युवा कार्यकर्ता सनी यादव यांना पितृशोक.
हणमंत आनंदराव यादव यांचे शुक्रवार दि. ०२ मे २०२५ रोजी रात्री ०२:०० वा. सुमारास आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६४ वर्ष होते.
शनिवार दि. ०३ मे रोजी दुपारी ०१:३० वाजता त्यांचेवर भिलवडी येथील कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय अंत्यसंस्काराला कृष्णा घाटावर जमा झाला होता.
त्यांचे पश्चात त्यांना पत्नी , दोन मुले , एक मुलगी व एक सुन असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन ---सोमवार दि. ०५ मे २०२५ रोजीसकाळी १० : ०० वाजताभिलवडीच्या कृष्णा घाटावर होणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰