सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरूवार, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) निधीतील कामांचा योजनानिहाय आढावा (सन 2023-24, 2024-25) राज्यस्तरीय यंत्रणा. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून एम.आय.डी.सी. कुपवाडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे, कृष्णा व्हॅली रोड, पाण्याच्या टाकीजवळ, कुपवाड एम.आय.डी.सी. येथे आगमन व एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे येथे भेट व आढावा आणि संवाद बैठक. दुपारी 2.30 वाजता कुपवाड एम.आय.डी.सी. येथून शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून कुंडल ता. पलूसकडे प्रयाण.
सांयकाळी 5.45 वाजता कारखाना परिसर, क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे आगमन व क्रांतीसिंह नाना पाटील स्मारक व क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक स्थळी भेट व आढावा. सायंकाळी 6.15 वाजता प्रशासकीय कार्यालय, क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे शरद लाड यांची सदिच्छा भेट.
रात्री 8 वाजता वाहनाने पुणेकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰