पलूस दि. ०६ : मा.आमदार.पृथ्वीराज (बाबा) देशमुख.यांच्या नेतृत्वाखाली पलूस तालुका भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण अध्यक्षपदी मा.पै. मिलिंद भैय्या पाटील व पलूस शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी मा.पै. संदीप मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचा माजी.आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जनसंपर्क कार्यालय पलूस व पलूस शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पलूस केदार उद्योग समूहाच्या हॉलमध्ये भारतीय जनता पार्टिचे जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन नव सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे योगदान व उपस्थितीमुळे समारंभ यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी केदार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सर्जेराव नलावडे, सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय येसूगडे, पलूस तालुका ओबीसी उपाध्यक्ष सुभाष सुतार, शंकर पवार, संकेत येसूगडे, सचिन जाधव, उमेश पाटील , हणमंत मोहिते , सागर सुतार उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰