विटा दि. ७ : दलित समाजातील महिला पोलीस अधिकाऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, त्यांच्या मनाला लज्जास्पद असे वर्तन करणाऱ्या विशाल प्रकाश कुंभार याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याबाबत आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनाच्या वतीने
विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदन म्हटले आहे की, विटा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पि.एस आय. जयश्री कांबळे या पेट्रोलिंग करिता विटा येथील कुंभारवडा परिसरात गेल्या असता, या ठिकाणी वास्तवास असणारे व व्यवसायाने वकिल असणारे विशाल कुंभार यांनी दलित समाजातील असणाऱ्या पि.एस.आय जयश्री कांबळे यांना नाव विचारून यांचे नाव कांबळे असल्याचे समजताच, त्यांनी ही उच्च प्रतिष्ठित लोकांची सोसायटी आहे.या ठिकाणी तुमच्या सारख्या खालच्या जातीच्या लोकांनी यायची गरज नाही असे सुनावले. यावेळी कांबळे यांच्या सोबत असणारे कर्मचारी व सोसायटीतील इतर रहिवाशी यांच्या समोर संबंधित दलित महिला पोलीस अधिकारी यांना अपनास्पद वागणूक देऊन, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे समजते. त्याचबरोबर संबंधित विशाल कुंभार याने जयश्री कांबळे यांचेविषयी त्याच्या फेसबुक पेजवर कांबळे यांची बदनामी केल्याचे दिसून येत आहे. घडलेला प्रकार हा निंदनीय असून, याचा आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना व समाज बांधव जाहीर निषेध करीत आहे. विशाल कुंभार याच्यावरती तात्काळ अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा सर्व आंबेडकर चळवळीतील संघटना व समाज बांधव यांच्यावतीने शुक्रवार दि.८ ऑगस्ट २०२५ रोजी विटा येथील छ.शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात चक्कजाम आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी
अशा आशयाचे निवेदन मंगळवार दिनांक ५ आॅगस्ट रोजी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील यांना देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पलूस तालुकाध्यक्ष अविनाश काळीबाग, सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे,
वीरू फाळके, डिपीआय प्रदेश सरचिटणीस, दादासाहेब चंदनशिवे आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष, सुधीर कांबळे युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, संपत कांबळे दलित महासंघ जिल्हा उपाध्यक्ष, अमीर भैया मुलाणी आरपीआय युवक आघाडी खानापूर तालुकाध्यक्ष, संदीप लोंढे आरपीआय आंबेडकर गट खानापूर तालुकाध्यक्ष,स्नेहलकुमार कांबळे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰