सांगली, दि. 30 (जि. मा. का.) :- राज्यात 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजना अंमलात आली असून 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही त्यांनी तो 20 मे 2026 पूर्वी काढावा, असे आवाहन कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन स्वतः नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ, तसेच बियाणे, खते, औषधे यासारख्या कृषी निविष्ठांच्या प्राप्तीसाठी फार्मर आयडी अनिवार्य राहणार असल्याचेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. फार्मर आयडी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास पुणे विभाग सहाय्यक कृषी अधिकारी संगीता ननावरे (मो.क्र. 7588509492) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


