सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, 14 मार्च 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोडीने मिटविण्यासंदर्भात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय सांगली, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय १, २ व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे (फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, बँकेची दिवाणी दावे, नियमित दिवाणी दावे, भूमि संपादन प्रकरणे, कौटुंबिक वादातील प्रकरणे), चलनक्षम दस्तऐवज (N.I. Act 138) प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे व दावापूर्व प्रकरणे (वीज बिले, टेलिफोन बिले, पाणीपट्टी बिले, घरपट्टी बिले व बँकेतील वसुली प्रकरणे) ठेवता येणार आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


