मुंबई दि. १३ : व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने वर्ष २०२६ साठीचे राज्यस्तरीय ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. समाजोपयोगी, विकासाभिमुख आणि सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात प्रेरणादायी काम करणाऱ्या १५ पत्रकारांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांचे वितरण १५ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यपालांच्या हस्ते विशेष समारंभात करण्यात येणार आहे. समाजातील सकारात्मक घडामोडी, प्रेरणादायी कथा आणि विकासात्मक मुद्दे प्रकाशझोतात आणणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
यंदा या पुरस्कारासाठी राज्यभरातून ३३ पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून निवड समितीने कसून छाननी करून पात्र पत्रकारांची निवड केली आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकारांमध्ये कुणाल लाडे, संदेश साळुंके (हिंदुस्थान समाचार), शाहिद पठाण, रुपेश बागड, राहुल पवार, स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन, महेंद्रसिंग गिरासे, भारत सवणे, विनोद कांबळे, लियाकत पठाण, सारिका शिंदे, संदीप पिंपळकर, महेश जगताप आणि मल्हारी ओमासे यांचा समावेश आहे.
सकारात्मक पत्रकारितेला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजात आशावाद आणि विकासाच्या कथा पुढे आणण्याचे महत्त्व अधोरेखित करतात.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



