सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2025 ते माहे मार्च 2026 कालावधीतील 22 व्या हप्त्याचा देय लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दिनांक 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्योती बिश्नु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र खानापारा, गुवाहाटी, आसाम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या अनुषंगाने दिनांक 13 मार्च 2026 हा दिवस "PM-KISAN उत्सव दिवस" म्हणून साजरा करून कार्यक्रमाचा प्रभाव आणि शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी दिनांक 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सर्व कार्यालये, पंचायत मुख्यालय, कृषी विज्ञान केंद्र (KVK), मंडई आणि इतर योग्य ठिकाणी कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच या कार्यक्रमात https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


