भिलवडीत पहिल्यांदाच ‘नारी संजीवनी वॉकथॉन 2026’
YouTube video
भिलवडी दि. १२ : महिलांच्या आरोग्य जागरूकता व सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ‘नारी संजीवनी वॉकथॉन 2026’ या उपक्रमाचे आयोजन रविवार, 22 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजता सेकंडरी हायस्कूल प्रांगण, भिलवडी ता. पलूस येथे करण्यात आले आहे.
हा उपक्रम काकासाहेब चितळे फाऊंडेशन, जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी आणि सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. महिलांनी नियमित व्यायाम, चालणे आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी, या उद्देशाने वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाद्वारे “तंदुरुस्त महिला – सक्षम समाज” हा संदेश देण्यात येणार असून, भिलवडी व परिसरातील महिला, तरुणी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वॉकथॉनमध्ये सहभागी महिलांना प्रेरणादायी संदेश, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सामाजिक एकता आणि स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.
भिलवडी परिसरात महिलांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या आरोग्यदायी उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.
👉 स्थळ : सेकंडरी हायस्कूल प्रांगण, भिलवडी
👉 दिनांक : 22 मार्च 2026
👉 वेळ : सकाळी 7 वाजता
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


