yuva MAharashtra महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन



 

        सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील माविमच्या महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २८ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत कच्छी जैन समाज सभागृह, राम मंदिर कॉर्नर, सांगली येथे होणार आहे. सांगली शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन महिला बचत गटांच्या वस्तूंची खरेदी करावी आणि महिलांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.           

 

       या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, डाळी, कडधान्ये, सेंद्रिय फळे व भाजीपाला यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे.

 

            या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे पाटील, नाबार्ड सांगलीचे उपमहाव्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ उपस्थित राहणार आहेत. 


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰