yuva MAharashtra जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

 


    सांगली, दि. 28 (जि. मा. का) : पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे याचा ग्राहकांना सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

 

            सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल 550 किलो लिटर व डिझेल 700 किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल 940 किलो लिटर व डिझेल 1200 किलो लिटर आणि आयओसीएल कंपनीचा पेट्रोल 1490 किलो लिटर व डिझेल 5140 किलो लिटर इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

            तसेच जिल्ह्यात एलपीजीचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 2649 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 135 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा 45 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 93 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरीत करण्यात येणार असल्याचेही प्रसिध्दीपत्रकाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰