भिलवडी वार्ताहर : दि. १४ मार्च २०२६
प्रत्येक माणसाला समृध्द जीवन जगण्याचा ध्यास असतो. यासाठी प्रत्येक माणसाने आपली भाषा आणि शब्दसंपत्ती प्रथमतः समृध्द केली पाहिजे तोच माणूस समाजात सर्व दृष्टीने यशस्वीपणे जगू शकतो.आजच्या जगभरातल्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर समृध्द वाचन गरजेचे आहे असे प्रतिपादन अर्थतज्ञ व वक्ते डॉ.चंद्रशेखर टिळक यांनी केले सार्वजनिक वाचनालय भिलवडी व काकासाहेब चितळे फाऊंडेशन भिलवडी यांचे संयुक्त विद्यमाने स्व.काकासाहेब चितळे यांच्या ८४ व्या जयंती निमित्त अमृत महोत्सवी वाचन कट्टा समारंभा निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे अध्यक्षस्थानी होते. मकरंद चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व.काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गिरीश चितळे म्हणाले की,समजाला दिशा देण्यासाठी प्रबोधन करणे म्हणजे सामाजिक कार्य होय.पैशाने समृध्द झालेला समाज विचाराने समृध्द करण्यासाठी काकासाहेब चितळे यांनी वाचन चळवळ निर्माण केली.
भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे,नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, पंचायत समिती सदस्या हजाराबी सलामत यांचा वाचनालयाच्या वतीने ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.टिळक यांनी वाचनालयास ग्रंथ भेट दिली.
प्रास्ताविक व स्वागत कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले.पाहुणे परिचय उपाध्यक्ष डी.आर.कदम यांनी करून दिला.सूत्रसंचालन मयुरी नलवडे यांनी केले.आभार जयंत केळकर यांनी मानले.
यावेळी वाचनालयाचे विश्वस्त जी.जी.पाटील,सर्व संचालक वाचन कट्टा समूहाचे सर्व सभासद,जायंटसप रिवारातील सदस्य उपस्थित होते.
डॉ.चंद्रशेखर टिळक यांचेकडून ग्रंथ भेट स्वीकारताना गिरीश चितळे,भगवान पालवे,मकरंद चितळे,सुभाष कवडे आदी मान्यवर.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



