भिलवडी दि. ११ : भिलवडी ता. पलूस येथे जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी & सहेली ग्रुप यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जायन्ट्स रत्न स्व. काकासाहेब यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांतर्गत उन्हाळ्यात नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ७० जणांनी रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली.
तसेच, महाल्याब व भिलवडी शासकीय रुग्णालय तसेच जायन्ट्स ग्रुप व सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०३ नागरिकांनी सहभाग घेतला व आरोग्य तपासणी करून घेतली.
या उपक्रमासाठी मा. गिरीश चितळे, मकरंद चितळे, भक्ती चितळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास पुण्याचे उद्योजक शेखर सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष बाहुबली चौगुले, सुबोध वाळवेकर, जायन्ट्स मेंबर प्रदीप चौगुले , मनोज चौगुले महावीर चौगुले, विशाल सावळवाडे, संभाजी महिंद, सचिन मगदूम, सुनिल परीट तसेच सहेली ग्रुपच्या अध्यक्षा उज्वला परीट, स्मिता वाळवेकर आणि सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
रक्त संकलनाची जबाबदारी आदर्श ब्लड सेंटर, सांगली यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच भिलवडीतील वठारे गुरुजी, राजन कुलकर्णी व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या समाजोपयोगी उपक्रमांमुळे भिलवडी परिसरात जायन्ट्स ग्रुपच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजसेवेचा आदर्श ठेवत केलेल्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰











