yuva MAharashtra जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध

जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध



 

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून, गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच एलपीजी कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच, जिल्ह्यात गॅस एजन्सीची तपासणी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

 


प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर सांगली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅसकरिता अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

 



24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन

 

या अनुषंगाने पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एलपीजी गॅससंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन नं. 18002333555 व इतर अत्यावश्यक पदार्थांच्या पुरवठ्यासंबंधी तक्रार नोंदविण्याकरिता लँडलाईन नं. 0233 2600500 या नंबरवर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰






🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰