Full video (click on the link)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/26LhPSkOvN4?si=RsKPiDWO8KnHD1g3
नारी शक्तीचा जल्लोष!
भिलवडी दि. २३ : जायंटस् ग्रुप ऑफ सहेली आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नारी संजीवनी वॉकथॉन स्पर्धा 2026 – सिजन 1” हा उपक्रम भिलवडी येथे उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
महिलांच्या आरोग्य, सशक्तीकरण आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमात भिलवडीसह परिसरातील तब्बल सहाशेहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन चितळे उद्योग समूहाच्या उद्योजिका सौ. भक्ती चितळे, युवा उद्योजक श्री. मकरंद चितळे तसेच सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सौ. उज्वला परीट, सौ. चैत्राली कुलकर्णी, सौ. स्मिता वाळवेकर, सौ. अश्विनी मगदूम, सौ. आशाराणी महिंद, सौ. स्नेहा शेडबाळकर, सौ. सविता सूर्यवंशी, सौ. सीमा शेटे, सौ. अनिता गुरव आणि सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अत्यंत सुयोग्य रीतीने केले.
याप्रसंगी जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, जायन्ट्स वेलफेअरचे केंद्रीय समिती सदस्य, जायन्ट्स 2 क च्या अध्यक्ष व कार्यवाह तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
स्पर्धेचा प्रारंभ चितळे उद्योग समूहाचे संचालक श्री. विश्वास चितळे, प्रियांका भगत, डॉ. अशा गाजी, मंजिरी गद्रे, दिपाली सिंहासने, अनघा चितळे आणि स्मिता चितळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
या कार्यक्रमाला चितळे डेअरी व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच भिलवडी पोलिसांनी देखील विशेष सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमात ओमकार रोकडे आणि टीम यांच्या झुंबाच्या ठेक्यांवर उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद लुटत उत्साह द्विगुणित केला. संपूर्ण वातावरणात ऊर्जा, आत्मविश्वास आणि एकजुटीचा संदेश झळकत होता.
हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून महिलांच्या आरोग्य जागरूकतेसाठी आणि समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी उचललेले एक प्रभावी पाऊल ठरले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


