yuva MAharashtra मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण



मुंबई, दि. २६: मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.





कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.





या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी ६३३ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीचा प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. हा प्रतिसाद वेळ या वाहनांच्या समावेशामुळे निश्चितच आणखी कमी होणार आहे. गुन्ह्याची जलद गतीने उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच दुचाकी, चार स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने एक अशाप्रकारे एकूण दहा वाहने देण्यात येणार आहेत. ही चार चाकी वाहने मोबाईल डाटा टर्मिनल, जीपीएस यंत्रणा, व्हेईकल ट्रेकिंग यंत्रणा आधी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰