yuva MAharashtra खटाव येथे सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम

खटाव येथे सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम



भिलवडी दि. २६ – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा भाग म्हणून सांगली जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व प्रांताधिकारी शिवाजी जगताप  यांच्या उपस्थितीत खटाव येथे विविध कार्यक्रम पार पडले.


या वेळी लक्ष्मीमुक्ती जिवंत 7/12, वारस नोंदी आदी योजनांचे आदेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर व प्रांताधिकारी जगताप यांनी ग्रामस्थांना दिली.




खास करून खटाव गावातील लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला याबाबत अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर यांनी तहसीलदार पलूस सौ. दीप्ती रिठे, महसूल विभाग पलूस व ग्रामपंचायत खटाव यांचे कौतुक केले.



त्यानंतर एम.एस.ई.बी. सब स्टेशन येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी त्यांचे स्वागत कनिष्ठ अभियंता मा. राजमाने  यांनी केले.





कार्यक्रमास खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील, उपसरपंच श्रीकृष्ण पाटील, माजी उपसरपंच शिवाजी पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, सौ. मोनिका पाटील, सौ. सुरेखा पाटील, सौ. सुविद्या चौगुले, सौ. रुपाली कर्नाळे, मंडल अधिकारी आण्णासाहेब हांगे, ग्राममहसूल अधिकारी सौ. पूजा सूर्यवंशी, ग्रामसेवक रवींद्र गायकवाड, वैद्यकीय अधिकारी सचिन मगदूम, पशुवैद्यकीय अधिकारी संदीप भिंगारदेवे, तसेच दीपक पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह सर्व योजनांचे लाभार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हेही पहा ---


https://youtu.be/fTF0T-krLhA?si=r6Y8Y14ZW_3cur2

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰