yuva MAharashtra शिक्षकांचा शनिवारचा मोर्चा रद्द,शिक्षकांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात सरकार बाजू मांडणार..

शिक्षकांचा शनिवारचा मोर्चा रद्द,शिक्षकांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात सरकार बाजू मांडणार..

 



                           VIDEO
          श्री चंद्रशेखर क्षीरसागर, प्रसिद्धीप्रमुख

        महेश शरनाथे, अध्यक्ष, समन्वय समिती


इस्लामपूर दि. 3 : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री  ना.श्री. पंकज भोयर यांची ग्वाही दिली आहे.दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता १ ली ते ८ वी ला अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ( TET )  अनिवार्य केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन केले होते, असे समन्वयं समिती प्रमुख श्री महेंश शरनाथे,  सदाशिव वारे, शशिकांत पाटील यांनी सांगितले.जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून  सांगली जिल्ह्यात मूक मोर्चा चे आयोजन केले होते. या बैठकीसाठी अध्यक्ष महेश शरणाथे, माणिकराव पाटील, सयाजीराव पाटील, शशिकांत पाटील, संजय साबळे, महादेव पाटील, संतोष कदम,दिवाणजी देशमुख, चंद्रशेखर क्षीरसागर, मुकुंद सूर्यवंशी,अरविंद गावडे प्रमोद काकडे,मुरलीधर दोडके, सुनील सूर्यवंशी,राजेंद्र कांबळे परशुराम जाधव, मनोहर साबळे, रमेश पेटकर, श्री बहुर्ले,अजय राक्षे, ज्ञानदेव भोसले आणि समन्वय समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. शनिवारी आयोजित शिक्षक मोर्चाची गांभीर्याने व संवेदनशीपणे दखल घेत,यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. श्री. पंकज भोय यांनी रवी भवन नागपूर येथे राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधीची बैठक घेतली . बैठकीला राज्याचे शालेय शिक्षण सचिव  श्री.रणजीतसिंह देओल  शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक श्री. शरद गोसावी उपस्थित होते.

बैठकीत या परीक्षेसंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी आग्रही मागणी केली.  शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री पंकज भोयर यांनी ही मागणी मान्य केली आहे. महाराष्ट्र शासन शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची ग्वाही दिली आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना व्यासपीठ व सांगली जिल्हा समन्वय समितीने निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांना निवेदन देऊन 4 ऑक्टोबर च्या शिक्षकमुक मोर्चा आंदोलन संस्थगित केल्याचे समन्वय समितीने जाहीर केले आहे.

🎶🎤 📢📢📢📢📢📢📢📢📢📢 🎶🎤



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰