सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : महिलांच्या दैनंदिन उपजीविका चालवण्यासाठी तथा चरितार्थ निवारणासाठी अनेक शासकीय योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांमुळे गरजू, विधवा, निराधार, अविवाहित तसेच श्रमिक महिलांना मदत मिळून त्यांच्या उपजीविकेला हातभार लागला आहे. सांगली जिल्ह्यात हजारो महिलांना या योजनांचा थेट लाभ झाला आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना -
तहसिलदार कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते. यामधून विधवा, अविवाहित, घटस्फोटीत, परित्यक्ता व पतीपासून विभक्त महिलांना महिन्याला दीड हजार रूपये आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. २०२४ -२५ मध्ये तब्बल ३२,३४७ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दाखला/ शाळा सोडलेला किंवा शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला यापैकी एक, वयाचा पुरावा, पती मुत्यू दाखला, आधार कार्ड, तहसीलदार यांचा रक्कम रूपये २१००० चा उत्पन्न दाखला, नावात बदल असलेबाबत तसेच भिकारी याचिका व शेत जमीन नसलेबाबत प्रतिज्ञापत्र आदि कागदपत्रे जमा करावी लागतात. या कागदपत्रांबरोबरच विधवा महिलेने मुलांचे जन्म दाखले तसेच, ३५ वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्रीने स्वतःहून बंधपत्र देणे आवश्यक आहे. तसेच, घटस्फोटीत महिलेने न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची किंवा निर्णयाची सत्यप्रत आणि मुलांचे जन्म दाखले तसेच, मुस्लिम स्त्री बाबत मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करणारी संस्था यांचेकडील ठराव अथवा तहसिलदार समोरील शपथपत्र सादर करावे लागते. परितक्त्या / पतीपासून विभक्त 1500/- रूपये. पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, संजय गांधी योजना कार्यालय,सांगली संपर्क क्रमांक – ०२३३-२६००३२०.
अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजना –
शासनाने पुर्वीची बीपीएल व केशरी गट योजनेमध्ये बदल करून त्याऐवजी अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजना सुरू केली आहे. यामध्ये अंत्योदय योजनेसाठी उत्पन्न मर्यादा 21000/- व प्राधान्य कुटुंब योजना शहरी 59000/- व ग्रामीण 44000/- प्रमाणे आहे. सध्या जिल्हयात अंत्योदय कार्ड संख्या 30396 असून त्यांना प्रति कुटूंब 15 किलो गहू व 20 किलो तांदुळ एकुण 35 किलो प्रति माह तसेच प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये 398481 कार्ड संख्या असून त्यांचे लाभार्थी 1691652 आहेत. यांना प्रति लाभार्थी 2 किलो गहू व 3 किलो तांदुळ या प्रमाणे प्रति माह धान्य मोफत दिले जाते.
यामध्ये शासनाने या शिधापत्रीका धारकांमध्ये कुटूंब प्रमुख म्हणून कुटूंबातील जेष्ठ महीला यांना प्राधान्य दिलेले आहे.
स्वस्त धान्य दुकान मंजुरी
महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिला सहकारी संस्थांना स्वस्त धान्य दुकान मंजूर करून स्वावलंबनाची दिशा देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील महिलांना १७४ स्वस्त धान्य दुकाने चालविण्याची परवानगी मिळाली आहे.
पत्ता व संपर्क क्रमांक – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली पुरवठा शाखा सांगली मिरज रोड, विजयनगर, सांगली
घरेलु कामगारांसाठीच्या योजना
महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ व इमारत आणि बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत प्रसूती लाभ व सन्मानधन योजना, अंत्यविधी सहाय्य दिले जाते. यामध्ये ५५ ते ६० वर्षांखालील महिलांना रुपये २,००० ते १०,००० पर्यंत लाभ मिळतो. यासाठी जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड या पैकी कोणताही एक वयाचा पुरावा, आधारकार्ड, रेशनकार्ड या पैकी कोणताही एक वास्तव्याचा पुरावा, फोटो आयडी पुरावा-आधारकार्ड, बँक पासबुक, दोन फोटो, घर मालकाचे प्रमाणपत्र आदि कागदपत्रे जमा करावी लागतात. रू.२,०००/- रू.५,०००/- रू.१०,०००/-(५५ ते ६० वर्षाच्या आतील घरेलू महिलांना). या योजनेचा २०२५-२६ मध्ये ६४ महिलांनी लाभ घेतला आहे.
पत्ता व संपर्क क्रमांक - महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग सांगली. ०२३३-२९५०११९
या सर्व योजनांमुळे सांगली जिल्ह्यातील महिलांना उपजीविकेसाठी भक्कम आधार मिळत आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या थेट आर्थिक मदत, धान्यवाटप आणि रोजगारसंधीमुळे महिलांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे
00000
पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयात
प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे शैक्षणिक सत्र 2026-2027 साठी इयत्ता 9 वी आणि 11 वी कला व विज्ञान या शाखांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया 25 जुलै 2025 पासून सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 23 सप्टेंबर 2025 होती. आता अर्ज भरण्यासाठी 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय पलूस चे प्राचार्य अनिल कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ही प्रवेश परीक्षा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पलूस येथील केंद्रावर होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे विज्ञान शाखेबरोबरच कला शाखा सुरू करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील 8 वी च्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी 9 वी करीता https://cbseitms.nic.in/2025/
इयत्ता 11 वी थेट प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
तसेच शैक्षणिक सत्र 2025-26 साठी इयत्ता 11 वी विज्ञान व कला शाखा यासाठी ऑफलाइन थेट प्रवेश (SPOT ADDMISSTION) प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत आहे. 10 वी पास विद्यार्थी 11 वी साठी प्रवेश अर्ज भरू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांची जन्मतारीख 01 जून 2008 ते 31 जुलै 2010 दरम्यान असावी. विद्यार्थ्यास दहावी मध्ये वर्ष 2024-2025 मध्ये 60 टक्के गुण असावेत. तसेच विद्यार्थ्यास दहावी मध्ये विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये प्रत्येकी 60 गुण असावेत.
प्रवेश अर्ज भरताना काही समस्या असल्यास विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत देशपांडे मो.नं. 7972870877, विलास शहापूरकर मो. नं. 9423575901 यांच्याशी संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
हेही पहा-
https://youtu.be/cLLlg_ZvEb0?si=s5frFubRW_xRDm8D
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




