yuva MAharashtra महाराष्ट्र राज्यातील वाढती गुन्हेगारी,अत्याचार महीला शोशन व अवैद्य व्यवसायाला संरक्षण देणा-या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.... _वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांचे निवेदन._

महाराष्ट्र राज्यातील वाढती गुन्हेगारी,अत्याचार महीला शोशन व अवैद्य व्यवसायाला संरक्षण देणा-या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.... _वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांचे निवेदन._




                                   व्हिडीओ 



सांगली दि.४
महाराष्ट्र राज्यातील महायुती शासन राज्यात आल्यापासून उत्तरप्रदेश,बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये ही अन्याय अत्याचार, महिला शोषण,वाढती गुन्हेगारी, अवैद्य नश्यावंत व्यसनाला संरक्षण आदी बाबी लक्षात घेता. सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. राज्यामध्ये शांतता सुरक्षितता व एकात्मता महिला संरक्षण राहण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी. अन्यथा राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला अडवून जाब विचारला जाईल होणाऱ्या परिस्थितीत प्रशासन व मंत्रिमंडळ जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी दिला आहे.

           महाराष्ट्रामध्ये भाजप व मित्र पक्षाचे सरकार स्थापन झालेपासून व देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा पदभार घेतले पासून महाराष्ट्रात खून, बलात्कार, खंडणी, मारामारी, महापुरुषांची बदनामी, विचारवंतांना आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना धमक्या व नशेचे रॅकेट, अवैध धंदयाचा सुळसुळाट मोठया प्रमाणात सुरु आहे यामुळे कायद्या सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. किशोरवयीन विद्यार्थिनी, महिला सुरक्षित नाहीत.  महाराष्ट्रात रोज एका ठिकाणी महिला तसेच मुलींच्या वर अन्याय, अत्याचार होताना दिसत आहे. मंत्र्यांच्या मुलींची छेड काढण्याचे प्रकार या भाजप आणि मित्र पक्षाच्या सरकारच्या  कार्यकाळात घडताना दिसत आहे. सद्याची परिस्थिती पहाता पोलीस प्रशासनाचा धाक गुन्हेगारांच्यावर राहिलेला नाही. सत्ताधारी राज्यकर्ते आपल्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय महामानवाच्या बाबतीत बेताल वक्तव्ये करून समाजा समाजात मध्ये तेढ निर्माण करून अराजकता माजवण्याचे काम करीत आहेत. शेतकरी,कामगार, बेरोजगार युवक, सर्वसामान्य व्यक्ती, याचबरोबर भारत देशाचे सैनिक सुध्दा त्रासलेला दिसत आहे. भारतीय सैनिकांना सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी हातात कटोरा घेऊन मुंबई येथे आझाद मैदानावर न्याय व हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. हि बाब शरमेने मान खाली घालणारे आहे.

  शासनाने नशा मुक्त भारत करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु असे होताना दिसत नसून याउलट  तरुणांना अधिकच नशेच्या खाईत ढकलण्याचे काम जोमाने होताना दिसत आहे. गुजरात राज्यापासून आता सांगली जिल्ह्यातील छोट्या खेडेगावा पर्यंत नशेचे रॅकेट पसरलेले स्थानिक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या मधून सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. मुख्य सुत्रधारास अटक करण्यास अद्याप यश आलेले दिसत नाही. अक्षरशः तरूण पिढी बरबाद होताना दिसत आहे. शासनाने वेगवेगळ्या कमिटीची स्थापना केली आहे. परंतु त्या माध्यमातून ठोस परिणाम होताना दिसत नाही. म्हणाव तेवढा पोलीस प्रशासनाचा धाक गुन्हेगारांच्यावर राहिलेला नाही, गृहखाते पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आद. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनीयन सांगली जिल्हा मार्फत करीत आहेत. तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

                               व्हिडीओ 




यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, वंचित बहुजन आघाडी सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, लता तोडकर, मुमताज शेख, सुनीता पाटील, रेखाताई अवघडे, गणेश मासाचे, विक्रांत गायकवाड, योगेश पाटील, हनमंत शिंदे, संदिप भोगे, मल्लीकगुलाब शेख, सतीश पवार, प्रकाश पवार, शिवाजी पाटील, दत्तात्रय सपकाळ,आनंदा सपकाळ, सतिश कांबळे, समीर वाडकर यांच्या बरोबर मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰