पलूस दि. ०४ : पलूस तालुका खरेदी-विक्री संघ लि., चिंचणी (अंबक) च्या २०२४-२५ ते २०२९-३० मधील संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी २७ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. एकूण १५ जागांसाठी १५ अर्ज दाखल करण्यात आले. २८ फेब्रुवारीला झालेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेत सर्वच्या सर्व १५ अर्ज वैध्य ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. तशी अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. एल. पवार यांनी केली आहे. यावेळी क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडून सर्व नवनियुक्त संचालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
४८६ सभासदांच्या या संघाची सुरवात शासनाचे कोणतेही भाग भांडवल न घेता स्वतःच्या भाग भांडवलावरती करण्यात आली होती. संपूर्ण सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपयांची असून पलूस, वांगी, भिलवडी (माळवाडी), आळसंद व येडे (उपाळे) या पाच शाखांमधून सर्व कामकाज सुरू आहे.
संघामार्फत शेतकऱ्यांना नामांकित कंपनीची, उच्च दर्जाची रासायनिक खते, औषधे व बी-बियाणांचा पुरवठा मापक दारात करण्यात येतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पिकांची पाहणी करून मोफत मार्गदर्शन केले जाते.
यंदाच्या संचालक मंडळ निवडणुकीत सर्वसाधारण गटातून १० संचालक तसेच महिला राखीव गटातून २ संचालक आणि इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती, अनुसूचित जाती-जमाती गटातून प्रत्येकी एका संचालकाची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संघाचे सचिव विकास पाटील यांनी दिली.
नवनिर्वाचित संचालक मंडळसर्वसाधारण प्रवर्ग :-श्री. शरद अरुण लाड, कुंडलश्री. शशिकांत गणपतराव पाटील, चिंचणीश्री. अनंत शंकर जोशी, अंकलखोपश्री. पोपट वसंतराव फडतरे, आमणापूरश्री. जगन्नाथ यशवंत चव्हाण, वांगीश्री. सतीश गोविंद संकपाळ, बांबवडेश्री. सोमनाथ सिद्धेश्वर घार्गे, उपाळे (मायणी)श्री. सतीश जयपाल चौगुले, भिलवडीश्री. निशांत उद्धव पाटील, मोराळेश्री. सिद्धार्थ बबन नांगरे, कडेगावमहिला राखीव प्रवर्ग :-सौ. मीनाक्षी दत्ताजीराव मोहिते, मोहिते वडगावश्रीमती शारदा निवास मांडके, शिरसगावइतर मागासवर्गीय प्रवर्ग :-श्री. अजित बाबालाल मुलाणी, शिवणीभटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग :-श्री. पांडुरंग जगन्नाथ हजारे, नगराळेअनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग :-श्री. राजेंद्र अशोक रुपटक्के, माळवाडी
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰