yuva MAharashtra संजिवनी सह.विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सखाराम मोरे यांची बिनविरोध निवड..

संजिवनी सह.विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सखाराम मोरे यांची बिनविरोध निवड..




पलूस/ भिलवडी : माळवाडी (भिलवडी) येथील संजिवनी सह.विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सखाराम आकाराम मोरे यांची बिनविरोध निवड..

पलूस तालुक्यातील माळवाडी (भिलवडी) येथील संजिवनी सह.विकास सोसायटीच्या चेअरमन पदी  सखाराम आकाराम मोरे यांची बिनविरोध निवड झाली.


 सोसायटीच्या संचालक मंडळाची गेल्या काही दिवसापूर्वी एक बैठक झाली. या बैठकीत सोसायटीचे मावळते चेअरमन सौ वैशाली जयसिंग टकले यांनी दुसऱ्या संचालकांना चेअरमन पदाची संधी देण्यासाठी त्यांनी स्वखुशीने आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला व नूतन चेअरमन पदाची निवडणूक घेण्याचे ठरले. 

मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी संजिवनी सह.विकास सोसायटी येथे नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत चेअरमन पदासाठी सखाराम मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.




सर्वांना बरोबर घेत बिनविरोधची परंपरा जपत सर्वांच्या सहकार्याने हि निवडणूक बिनविरोध करुन गावाने सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.



 संस्थेचे जेष्ठ माजी चेअरमन रमेश भोकरे व आनंदराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे इतर सर्व संचालक यांनी निवडणूक बिनविरोध करणेकामी तसेच चेअरमन निवड बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केले.





सोसायटीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन बी. पाटणकर सहकार अधिकारी श्रेणी- 2 ,  पलूस यांनी तसेच सोसायटीचे सचिव अमोल चव्हाण यांनी काम पाहिले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक शांततेत पार पडली.
 
यावेळी नुतन चेअरमन सखाराम मोरे यांचा सत्कार व्हाइस चेअरमन शिवाजी भोळे यांच्यासह उपस्थित संचालकांच्या हस्ते झाला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांचा सत्कार ज्येष्ठ माजी चेअरमन रमेश भोकरे यांच्या हस्ते झाला. 

सोसायटीचे मावळते चेअरमन वैशाली टकले यांनी नूतन चेअरमन सखाराम मोरे यांना पदभार दिला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 यावेळी अनिल माळी , दादासो मोहिते , संतोष माने , दीपक मंडले , भालचंद्र कांबळे  , मधुकर नलवडे , शंकर साळुंखे , जुबेदा तांबोळी यांच्यासह इतर मान्यवर व सोसायटीचे सर्व संचालक , कर्मचारी वर्ग व सोसायटीचे सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰