yuva MAharashtra कुंडलच्या 'उपसरपंच'पदी 'किरण लाड' बिनविरोध ; 'क्रांतिअग्रणी'चे अध्यक्ष शरद लाड यांच्याहस्ते सत्कार

कुंडलच्या 'उपसरपंच'पदी 'किरण लाड' बिनविरोध ; 'क्रांतिअग्रणी'चे अध्यक्ष शरद लाड यांच्याहस्ते सत्कार




कुंडल (ता. पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किरण लाड यांची निवड झाली.
माजी उपसरपंच अर्जुन कुंभार यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वानुमते किरण लाड यांच्या नावाला पसंती देण्यात आली. यावेळी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते उपसरपंच किरण लाड यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. 


शरद लाड म्हणाले, गावगाड्याशी प्रत्यक्ष संबंध येणारी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपली ग्रामपंचायत असते. कोणत्याही ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच नवनिर्वाचित सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने गावचे प्रशासन हाताळणे अपेक्षित आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या  आपल्या कुंडलच्या ग्रामपंचायतीचा दर्जा आणि उंची मोठी असून गावातील सर्वसामान्य लोकांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा सुद्धा आपण आपल्या कामाच्या माध्यमातून पूर्ण कराव्यात, ही अपेक्षा व्यक्त करतो.
यावेळी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰