BANNER

The Janshakti News

मा.श्री, मनोज चौगुले यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड......



 पलूस तालुक्यातील भिलवडी गावच्या ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष युवा उपसरपंच मा. श्री. पृथ्वीराज पाटील  यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर मा.श्री, मनोज श्रीपाल चौगुले यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
अशी माहिती सरपंच सौ. विद्याताई सचिन पाटील यांनी दिली. 

   सरपंच सौ. विद्याताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० मे २०२४ रोजी भिलवडी ग्रामपंचायत कार्यालयात हि निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर या निवडणूक प्रक्रियेसाठी  ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के.एम.केदारे यांनी मदत केली. या प्रसंगी मा.श्री, मनोज चौगुले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जहिर करण्यात आले. 

  या प्रसंगी सरपंच विद्याताई पाटील यांच्यासह भिलवडी ग्रामपंचायतचे सर्व  सदस्य उपस्थित होते. 
  
 गावातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते मंडळी (कोर कमेटी) व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यात आपसात ठरल्याप्रमाणे व इतर सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळावी म्हणून मा. श्री. पृथ्वीराज पाटील यांनी स्वखुशीने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.

 भिलवडी गावचा सर्वांगीण विकासाचा मानस नवनिर्वाचित उपसरपंच मनोज चौगुले यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला. 

 बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य ,गावातील नेते मंडळी व  ग्रामस्थांनी मा.श्री, मनोज चौगुले यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर कार्यकर्त्यांनी निवडीनंतर फटाक्यांची आताषबाजी करत निवडीचा जल्लोष केला.



 यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते संग्राम दादा पाटील व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बि.डी. पाटील यांनी काँग्रेस कमिटी व समस्त भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने  नुतन ग्रामपंचायत उपसरपंच मा. मनोज चौगुले यांचा सत्कार केला.

  यावेळी  तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते , माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे , माजी उपसरपंच मोहन तावदर , माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब शिंदे , माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मगदूम , यांच्यासह खंडू अण्णा शेटे , महावीर किणीकर , राहुल कांबळे , बाळासाहेब महिंद-पाटील , देसाई सर , विद्यासागर ऐतवडे , प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार , ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖