पलूस : दि. २३ मे २०२४
पलूस शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी गोठ्यातील ११ बकर्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पलूस-आमणापूर रस्त्यावरील समर्थनगर भागात घडली.
शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा शाळकरी मुले, रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवाशी व पाळीव जनावरे यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
अशा चिंताजनक घटना गेल्या अनेक दिवसांपासून घडत असून या बाबतीत संबंधित प्रशासनाने कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,
पलूस-आमणापूर रस्त्यावरील समर्थनगर भागातील रहिवासी तानाजी पुदाले यांच्या मालकीच्या ११ बकर्या त्यांच्या घरानजीकच्या गोठ्यात बांधण्यात आल्या होत्या. मोकाट कुत्र्यांनी गोठ्यात घुसून बकर्यांवर हल्ला केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. सकाळी सकाळी शेळ्यांचा मोठ्याने आवाज ऐकताच तानाजी पुदाले यांच्या घरा शेजारी राहाणारे शेजारील लोक घटनास्थळावर धावत आले. तोपर्यंत कुत्र्याने केलेले हल्ल्यात एक शेळी ठर झाली होती. शेळी मृत्युमुखी पडल्याचे दिसताच शेजार्यांसह तानाजी पुदाले यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
तानाजी पुदाले यांच्या शेळ्यांवर हल्ला केलेल्या मोकाट कुत्र्यांना येथील नागरिकांनी तेथून हटकल्यानंतर त्या मोकाट कुत्र्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला आणि पुढे जाऊन त्या मोकाट कुत्र्यांनी विष्णू मोरे यांच्या घरातील शेळ्यावर हल्ला चढवला आणि त्या ठिकाणीही झालेल्या हल्ल्यात एक शेळी मृत्युमुखी पडली.
शाळकरी मुले, रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवाशी व पाळीव जनावरे यांच्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला अशा घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे यावर संबधित प्रशासनाने तात्काळ आळा घालावा अशी जोरदार मागणी नागरिकांच्यातून होत आहे. तसेच शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.
हेही पहा ----
https://youtu.be/JSAb7xUEcLA?si=-ebYIf-TjKDy6SWL
https://youtu.be/-8o9CrlPUBs?si=wuYgPx-aHc9-m_Sv
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖