BANNER

The Janshakti News

सुखकर प्रवासासाठी हेल्मेट वापरासह वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर


राज्यस्तरीय निवासी आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न


सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : सुखकर प्रवासासाठी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असून विद्यार्थी दशेतच वाहतूक सुरक्षेचे महत्त्व सांगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय निवासी आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षणाच्या पासिंग परेड सांगता समारंभ प्रसंगी केले.

सांगलीत दिनांक 10 मे ते 19 मे दरम्यान राज्यस्तरीय 150 आर एस पी अधिकारींचे प्रशिक्षण  संपन्न झाले. पासिंग परेड सांगता समारंभ प्रसंगी आयोजित समारंभास अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, प्रशिक्षणाच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे  उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती आवश्यक आहे.  लहानपणीच विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण केली तर ते विद्यार्थी भविष्यात आदर्श नागरिकाची भूमिका बजावतील व भारताच्या उज्वल यशामध्ये मोलाचे योगदान देतील. मानवी चुकामुळे 85 टक्के अपघात होतात तेंव्हा रहदारीचे नियम आपण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी तर पालन करावेच पण विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा वाहतुकीच्या नियमाविषयी जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी  राजसाहेब लोंढे यांनी केले.
आरएसपी विषयाद्वारे अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल व लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल व महासमादेशक अनिल शेजाळे यांच्या या उपक्रमास निश्चित यश प्राप्त होईल, असे मत डॉ. रविंद्र ताटे व्यक्त केले.
महासमादेशक अनिल शेजाळे यांनी सांगलीच्या इतिहासातील प्रथम राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी घेतलेल्या परीश्रमाचे फलीत नक्कीच प्रत्यक्षात उतरेल व प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी कटीबद्ध रहाल अशी खात्री व्यक्त केली. 
दहा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये डॉ. दिलीप पटवर्धन यांनी जीवन  कसे जगावे या विषयावर व मानसिक ताणतणाव बाबतीत मार्गदर्शन केले. डॉ. माधवी पटवर्धन यांनी जागतिक आपत्ती, प्लास्टिक जागृती अभियान चळवळी विषयी माहितीदिली. डॉ. दिलीप गुप्ता यांनी प्रथमोपचार याविषयीचे महत्त्व सांगितले. पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांनी रस्ते अपघात व काळजी, व्यसनमुक्ती, पर्यावरण आणि आरोग्य या विषयावर प्रबोधन केले. डॉ. मोहन पाटील यांनी प्रथमोपचार व सी.पी.आर.बद्दल माहिती व प्रात्यक्षिक सादर केले. आरटीओ चे सहा. मोटार निरीक्षक सौरभ दडस यांनी इंटरसेप्टर मोटार वाहन याविषयी , सांगली, मिरज कुपवाड महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी विशाल मासाळ यांनी फायरमन वॉटर टेंडर याविषयी प्रात्यक्षिक, पदकवायत व ड्रील डी. आय. अशोक कोळी यांनी, श्री. निमकर, श्री. पोहरे यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये व्यक्तींनी कशी काळजी घ्यावी व कसे बचाव कार्य करावे याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती व श्री. शेख  यांनीही आपत्ती व्यवस्थापना विषयी माहिती दिल्याचे श्री. शेजाळ यांनी सांगितले.
या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, पोलीस अधीक्षक संदिप घुगे, यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणासाठी  महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता व उपायुक्त वैभव साबळे यांनी विशेष सहकार्य केले.

हेही पहा -----

https://youtu.be/_3GO0orJnM4?si=1HxMKUd1hIIahNmP

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖