BANNER

The Janshakti News

संभाव्य पूर परिस्थीतीच्या अनुषगाने भिलवडीत आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारी बैठक संपन्न..





भिलवडी दि. २१ : सन २०१९ व २०२१ वर्षातील पूर परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थीतीच्या अनुषगाने सोमवार दि. २० मे रोजी पलूस तालुक्यातील मौजे भिलवडी येथे मा.रणजीत भोसले  उपविभागीय अधिकारी उपविभाग कडेगाव यांचे अध्यक्षतेखाली व पलूसचे तहसिलदार मा.दिप्ती रेठे यांचे उपस्थिीत आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी बैठक पार पडली.
   
पूरपरिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना 

 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतरासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था, पशुधनाची काळजी, नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून करावयाच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी यंत्रसामुग्री तसेच पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवावीत असे सांगून स्थानिक यंत्रणांनी आपत्तकालीन परिस्थितीची माहिती तातडीने वरिष्ठांना कळवावी अशा सूचना उपविभागीय अधिकारी मा.रणजीत भोसले यांनी यावेळी दिल्या.
 
 सदर बैठकीस पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने , सरपंच सौ.विद्याताई सचिन पाटील , उपसरपंच पृथ्वीराज पाटील , कृषी सहाय्यक पाटोळे मॅडम , मंडल अधिकारी श्रीमती , सुरेखा जाधव , तलाठी सोमेश्वर जायभाये , वसगडे सुखवाडी चे तलाठी गौसमोहम्मद लांडगे , खंडोबाचीवाडी तलाठी दिपा मोहटकर , माळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एच.ए. कांबळे , ग्रामपंचायत सदश्य प्रशांत कांबळे,  ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच मोहन तावदर , सनी यादव,  राहूल कांबळे, आब्बू फकिर , अनिल मगदूम , गणेश पाटील, अमोल चव्हाण,    यांच्यासह  इतर शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी , ग्राम दक्षता समिती सदस्य व ग्रामस्थ , उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖