सांगली / इस्लामपूर 21 MAY 2024
इस्लामपूर दि. 21 : इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांच्याबरोबर केंद्रीय पत्रकार संघाची अनौपचारिक बैठक पार पडली.
यावेळी बोलताना श्री सूर्यवंशी म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा असतो.अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. नक्कीच पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रपणे काम केल्यानंतर समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी होत असते. राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप कसालकर यांच्या मार्गदर्शनात देशभर केंद्रीय पत्रकार संघाचे काम योग्यरीतीने चालू आहे.
यावेळी प्रेस, आर्मी लिहीलेल्या गाडी चेक करणे, पत्रकारांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक मिळणे, पत्रकारावरती हल्ले झाले तर पत्रकार संरक्षण हक्कांतर्गतच गुन्हे दाखल होणे याबाबतीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी श्री प्रदीप सूर्यवंशी यांनी पत्रकारांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यामुळेच सर्व गावांमध्ये ग्रामपंचायती व लोकांच्या सहभागातून सीसीटीव्ही बसवण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते श्री चंद्रशेखर क्षीरसागर, सांगली जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र लोंढे, वाळवा तालुका अध्यक्ष श्री विजय लोहार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुंभार, अमोल जाधव, उमेश जाधव, दत्तात्रय फसाले आणि इतर पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांचा केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने पुस्तक व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖