BANNER

The Janshakti News

सांगलीत 24 ते 26 मे कालावधीत आंबा महोत्सव




सांगली दि. 21 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य कृषि विभाग सांगली व कृषि पणन मंडळामार्फत 24 ते 26 मे 2024 या कालावधीत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत ‘सांगली आंबा महोत्सव 2024’ चे  कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली  येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन कृषि पणन मंडळ कोल्हापूर चे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले व सांगली चे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.   


विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळण्यासाठी हा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येथे आयोजन करण्यात आले असून आंबा महोत्सवाचे उद्घाटन 24 मे रोजी सकाळी 10 वाजता  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलीस अधिक्षक संदीप घुगे उपस्थित राहणार आहेत.


या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, स्थानिक केशर आंबा उत्पादक व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्याना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा व स्थानिक केशर आंबा उत्पादकाकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖