BANNER

The Janshakti News

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा 

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : दहशतवाद व  हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व  हिंसाचार विरोधी दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपस्थितांना दहशतवाद व  हिंसाचार विरोधी दिनाची प्रतिज्ञा दिली.            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖