BANNER

The Janshakti News

माजी सरपंच मा.श्री. विनायक (भाऊ) भोळे वाढदिवस अभिष्टचिंतन..======================================
======================================

भिलवडी | द जनशक्ती न्यूज  : 

राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या पलूस तालुक्यातील मौजे माळवाडी गावात सन 2000 ते सन 2015 या सलग तीन पंचवार्षिक निवडणूकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंच व उपसरपंच अशी पदे भूषविणारे माजी सरपंच मा.श्री. विनायक (भाऊ) भोळे यांचा आज जन्मदिन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
 
 
वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा अल्पपरिचय.

 राज्याचे माजी मंत्री तथा पलूस-कडेगाव विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.विश्वजित कदम यांचे विश्वासू सहकारी समजले जाणारे आणि भाऊ या नावाने पंचक्रोशीतील परिचित असणारे माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.श्री. विनायक (भाऊ) भोळे यांनी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य याच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादाने
सन 2000 ते 2015 अशा सलग तीन ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूका जिंकल्या आणि इथूनच त्यांची राजकारणाची व समाजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या कालावधीत त्यांनी काही काळ सरपंच तर काही काळ उपसरपंच पदाची धुरा सांभाळली. गावच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी अनेक महत्वाच्या भुमिका बजावल्या. अत्यंत अभ्यासूवृत्तीने केलेल्या कामाच्या अनुभवाच्या शिदोरीमुळे त्यांनी कार्यक्षम  सरपंच म्हणून आपला ठसा राजकारणाच्या पटलावर कोरला.

  माजी सरपंच मा.श्री विनायक (भाऊ) भोळे यांना द जनशक्ती न्यूज माध्यम समुहाच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆