BANNER

The Janshakti News

विजय वावरे क्रिकेट अकॅडमी चा खेळाडू दीप जाधव याचे नाशिक येथे शतक.



======================================
======================================



भिलवडी : वार्ताहर 

नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत दीप जाधव याने सांगली संघाकडून खेळताना पहिल्या डावात शतक झळकावले (110) . तर दुसऱ्या डावात गोलंदाजी मध्ये 3  बळी मिळविले. सांगली संघाने हा सामना निर्णायक जिंकून 5 गुणाची कमाई केली. 

  सांगली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय बजाज यांनी दीप जाधव याचे विशेष कौतुक केले.

दीप जाधव याला  सांगली क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष संजय बजाज साहेब, ज्येष्ठ प्रशिक्षक सागर पेंडूरकर, पोलाईट क्रिकेट क्लब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. 
दीप गेली पाच वर्षे  Bcci - level 1 ( Qualified level 2) क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी येथील क्रिकेट अकॅडमी मध्ये कसून सराव करत आहेत.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆