BANNER

The Janshakti News

मनोज जरांगे पाटील यांची उद्या सांगलीत जाहीर सभा ; लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सभेला उपस्थित राहणार



=====================================
=====================================

सांगली : वार्ताहर                    दि. 16 नोव्हेंबर 2023

  मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यावर आता आपल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक आणि ठाम असलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरु केला आहे. उद्या शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यात मायणीमार्गी प्रवेश करत ते सकाळी 8:30 वाजता विटा येथे पहिली सभा घेतील.

या सभेनंतर नियोजीत वेळेनुसार त्यांचे सकाळी 11 वाजता सांगली शहरात आगमन होईल. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते तरुण भारत स्टेडीयम येथील सभास्थळी दाखल होतील. मराठा आरक्षण लढ्यावर उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करून ते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कोल्हापूरकडे रवाना होतील. संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे आगमन व जनमुदायला पुढील आंदोलन संदर्भात मार्गदर्शन करून कराड कडे रवाना होतील.

 सांगली जिल्ह्यातील होणारी ही पहिली सभा असल्याने व सांगली जिल्ह्यातील मोर्चातील मुख्य मागण्या या सराटी सभेत पुढे आल्याने सांगली जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने समुदाय सभेला उपस्थित राहणार आहे. मोर्चाचे नियोजनासाठी संजय पाटील, राहूल पाटील, सतिश साखळकर, प्रशांत भोसले, नितीन चव्हाण, अमोल चव्हाण, चेतक खंबाळे, विजय साळुंखे, शंभूराज काटकर, रूपेश मोकाशी, प्रदीप कार्वेकर, सतिश भोसले, अमोल गोटखिंडी, अशोक कोकलेकर, विशाल लिपाने पाटील, अविनाश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील मराठा बांधव करत आहेत. 


शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची  जाहीर सभा तरुण भारत स्टेडियम येथे होणार आहे  यासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांची पार्किंग व्यवस्था खालील प्रमाणे केलेली आहे.
 स्टेडियमच्या समोरील वैरण अड्डा येथे टू व्हीलर व आरवाडे हायस्कूलचे ग्राउंड, भावे नाट्यमंदिर येथे टू व्हीलर ची पार्किंग व्यवस्था केलेली आहे.
 माई घाट सरकारी घाट परिसर कृषी उत्पन्न बाजार समिती गणपती मंदिर ची मागील बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम जिल्हा परिषद च्या बाजूची इ मॅन्युअल हायस्कूलचे ग्राउंड सॅमथॉम स्कूलचे ग्राउंड  त्रिकोणी बागेच्या शेजारील शिवशक्ती व्यायामंडळाचे ग्राउंड इत्यादी ठिकाणी फोर व्हीलर (4 चाकी) पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆