BANNER

The Janshakti News

नेचर फाऊंडेशन बुर्ली यांच्यावतीने पर्यावरण पूरक भव्य किल्ला स्पर्धा उत्साहात ; किल्ला स्पर्धेला तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद..




======================================
======================================

पलूस/बुर्ली : वार्ताहर दि. १८ नोव्हेंबर २०२३

 बुर्ली : नेचर फाउंडेशन बुर्ली यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पर्यावरण पूरक किल्ला बनवणाऱ्या किल्ल्यास प्राधान्य देण्यात आले.
बुर्ली,रामानंदनगर, शिरगाव, दुधोंडी या गावांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये स्पर्धकांनी आपल्या कलागुणांनी रायगड,राजगड,पन्हाळा,विशाळगड, सिंधुदुर्ग,तोरणा ,लोहगड, अशा विविध प्रकारच्या प्रतिकृती साकारल्या होत्या.
या भव्य किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांक -विराट ग्रुप बुर्ली (राजगड),द्वितीय क्रमांक -रॉयल कारभार ग्रुप बुर्ली (रायगड), तृतिय क्रमांक -गर्जना ग्रुप शिरगाव (रायगड), चतुर्थ क्रमांक -श्री.छ.शिवाजी ग्रुप बुर्ली (तोरणा) आणि उत्तेजनार्थ क्रमांक शिवशंभू ग्रुप बुर्ली (पन्हाळा). यावेळी सर्व विजेत्या आणि सर्व सहभागी स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, झाड आणि पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी विकास पाटील, विशाल जाधव,ॲड लखन वाडकर,सुशांत शिंदे,शेखर पाटील सर, ए.टी.पाटील सर, विरेंद्र पाटील,निरज पाटील, आलम नदाफ, ईश्वर सुतार, सुरज पाटील हे उपस्थित होते.
किल्ला स्पर्धेचे आयोजन नेचर फाउंडेशनचे सैफअली नदाफ, कैलास पाटील (महाराष्ट्र पोलीस), निरज पाटील, संतोष चौगुले, गणेश जाधव, विकास जाधव, प्रतीक जाधव,ओंकार खुडे, विशाल कोरे,अरमान नदाफ, संग्राम पाटील,निखिल पाटील,विनायक टोणपे,स्वरूप चव्हाण, इरफान नदाफ,अर्शद इनामदार,तुषार शिवदे,संदेश चौगुले, सनी मिठारी,आकाश पाटील यांनी केले.

मोबाईल आणि टीव्ही मध्ये रमलेल्या मुलांना त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आणि आपल्या इतिहासाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते, तसेच तरुणांमध्ये असलेल्या किल्ला संवर्धनाच्या जाणिवेला योग्य दिशा लाभावी म्हणुन हा आमचा छोटासा प्रयत्न होता असे नेचर फाउंडेशन चे अध्यक्ष सैफअली नदाफ यांनी सांगितले.


विजेत्या आणि सहभागी स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षाव..

विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी श्री.सचिन रामचंद्र सुतार (पोलीस पाटील बुर्ली, उद्योजक सेवागिरी उद्योग समुह बुर्ली) यांचेकडून रोख रक्कम स्वरूपात ५००१रू,
द्वितीय क्रमांकासाठी ॲड.श्री पवनकुमार राजाराम शिंदे यांचेकडून ४००१रू,
तृतीय क्रमांकासाठी ॲड.श्री लखन महादेव वाडकर यांचेकडून ३००१रू, चतुर्थ क्रमांकासाठी श्री.विशाल विलास जाधव (माजी जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस) यांचेकडून २००१रू आणि उत्तेजनार्थ क्रमांकासाठी ह.भ.प.श्री. ईश्वर शिवाजी सुतार (युवा किर्तनकार) यांचेकडून १००१रू. देण्यात आले
सर्व सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र श्री. निरज विकास पाटील (युवा उद्योजक,साईराजमाता उद्योग समुह बुर्ली) आणि
श्री. विरेंद्र चंद्रकांत पाटील (संजीवनी कन्ट्रक्शन बुर्ली) यांचेकडून देण्यात आले.
सर्व सहभागी स्पर्धकांना एक पुस्तक भेट श्री.शेखर पाटील सर यांचेकडून देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना एक झाड श्री.ए. टी.पाटील सर (राष्ट्रीय हरित सेनेचे जिल्हा समन्वयक) यांचेकडून देण्यात आले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆