BANNER

The Janshakti News

BRS पक्षाचे जेष्ठ नेते शंकर आण्णा धोंडगे यांचा उमरगा तालुका दौरा..


   ..येनेगुर येथील अनेक कार्यकर्त्यांचा BRS पक्षात प्रवेश=====================================
=====================================

उमरगा : वार्ताहर              दि. १७ जुलै २०२३

 भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्य समन्वयक मा.श्री. माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका दौर्‍यावर आले असता त्यांनी मकानदार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली . यावेळी शंकर आण्णा धोंडगे यांच्या सत्कार मुजीब मकानदार व राचय्या स्वामी यांनी केला.
तसेच येनेगुर येथे झालेल्या बैठकित BRS पक्षाचे राज्य समन्वयक मा. शंकर आण्णा धोंडगे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन वेळी उमरगा तालुक्यातील पदाधिकारी यांच्या कामाचे कौतुक केले. 
पक्षामध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी BRS पक्षाचे जेष्ठ नेते शंकर आण्णा धोंडगे यांच्या हस्ते अरबाज मकानदार,बाबा मालवाले,सलीम शेख,समीर शेख,अलताफ मबोली,जगदीश राठोड, दत्ता सुरवसे, राहुल गांवडे, विष्णू गुगळगावे, या कार्यकर्यांनी BRS पक्षात प्रवेश केला. 


 यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते मुजीब मकानदार , समन्वयक राचय्या स्वामी यांचेसह कार्यकर्ते  उपस्थित होते .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆