BANNER

The Janshakti News

"दिग्गजांसोबत एक तास" दिशा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

 
 
=====================================
=====================================
 
भिलवडी : वार्ताहर                 दि. १७ जुलै २०२३


पलूस तालुक्यातील भिलवडी व परीसरात गेल्या अनेक वर्षांपासून 
 "सामाजिक सलोखा गतिशील आणि कृतीशील" हे ब्रिदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या  दिशा फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमां अंतर्गत काल रविवार दि.16 जुलै 2023 रोजी " लहान मुलांना "दिग्गजा सोबत एक तास " हा एक नवीन विषय घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळा माळवाडी या शाळेचे मॉडेल स्कूल म्हणून जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. या शाळेमध्ये दिशा फाउंडेशन कडून दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या डिजिटल वर्गामध्ये मुलांना दिव्यांग मुलांच्या व्यथा, दिव्यांगत्वाचे असणारे प्रकार, शासनाकडून कोणत्या सोयी सुविधा मिळतात तसेच आपल्या दिव्यांगत्वावर मात करत काही शास्त्रज्ञ , खेळाडू ,कलाकार ,कवी ,गायक , संगीतकार यांनी ज्या पद्धतीने इतिहास रचला यांची सविस्तर माहिती मुलांना आजचे दिग्गजांसोबत एक तास मधील प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक मा.सागर कदम (विशेष शिक्षक पंचायत समिती पलुस) यांनी करून दिली.

यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  समाजसेविका सौ.स्मिता सचिन यादव यांच्या हस्ते भिलवडी स्टेशन येथील कु. रिजवान शिकलगार यास वॉकर देण्यात आली. 
 यावेळी दिशा फाऊंडेशनचे सचिन देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆