BANNER

The Janshakti News

सांगली जिल्ह्यांतून हजारो गायरान निवारा जमीन धारक विधान भवनावर धडकणार....

संजय कांबळे : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांची माहिती.


======================================
======================================

सांगली : वार्ताहर                         दि. १८ जुलै २०२३


महाराष्ट्रातील गायरान निवारा धारक नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आले. गुरुवार २० जुलै रोजी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 
सर्वांसाठी घरे - 2024 हे धोरण धाब्यावर बसवून महाराष्ट्र राज्यातील 2 लाख 22 हजार पेक्षा अधिक भूमिहीन बेघर शेतमजुर, भटके विमुक्त, आदीवासी, मागास वर्गीय, अनु. जाती-जमातीचे समुदायाला महसूल विभागाने नोटीस बजावल्या आहेत. पुढच्या टप्प्यात उर्वरित अतिक्रमण धारकांना नोटीस देवुन बेघर करण्याचे काम सरकार करीत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयात जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य प्रकरणात गायरान जमिनी सरकारने आपल्या ताब्यात घ्या असे आदेश दिले. 
तथापि, ज्या जमिनी गावकऱ्यांच्या सामान्यपणे अपयोग किंवा सार्वजनिक उपक्रम/ लोककल्याणकारी योजना उदा. दवाखाने, शाळा, इत्यादी उपक्रमासाठी राखीव ठेवल्या आहेत त्या जमिनीवरचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे असे म्हटले आहे. परंतु ज्या जमिनीच्या उपरोक्त कुठल्याही कारणासाठी राखीव नाहीत त्या सुद्धा काढण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दि. 22/09/2022 रोजी निर्गमित केला आहे. जिथे शाळा आहे तिथे सुद्धा अतिक्रमण निष्कासित करण्याचे नोटीस सरकारने दिले आहे. त्याचबरोबर सरकारच्या निधीतून म्हणजेच लोकांच्या पैशातून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना इत्यादी योजनेतून गायरान जमिनीवर घरे बांधण्यात आली ती सुद्धा निष्कासित करण्याचे नोटीस सरकारने दिले आहे. सरकारचे डोके ठिकानावार आहे का असा सवाल करीत वंचित बहुजन आघाडीने 20 जुलै 2023 रोजी मंत्रालयावर महा मोर्चाचे आयोजन आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आयोजिले आहे. 

राज्यातील 2,22,153  अतिक्रमण धारक जे कि भूमिहीन - बेघर - शेतमजुर, श्रमिक कामगार, अनु. जाती-जमाती भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मायक्रो ओबीसी अश्या वर्गातून येतात त्यांचे न्यायासाठी वंचितने लढाई सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थिती मध्ये अतिक्रमणे काढू देणार नसल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे. या लुटारू सरकारच्या विरोधात वंचित शोषित श्रमिक कष्टकरी कामगार बहुजनांनी ह्या गायरान जमिनीच्या निर्णायक लढ्यात सामील व्हा. असे आवाहन, मा. संजय कांबळे , जिल्हा संपर्कप्रमुख. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆