BANNER

The Janshakti News

सेकंडरी स्कूल भिलवडीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश





======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                  दि. १९ जुलै २०२३ 
 
पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी  पूर्व उच्च प्राथमिक इ.पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इ.आठवी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. पूर्व उच्च प्राथमिक (५वी) मध्ये सारंग शंतनू कुलकर्णी याने २४२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १०९ वा क्रमांक तर अनुष्का श्रीकृष्ण जंगम हिने २३० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत २०८ वा  क्रमांक मिळविला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. श्रुती महेश शेटे हिने २०८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १०७ वा क्रमांक, कु. शितल धनंजय मस्कर हिने १९६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १८२ वा क्रमांक, तर कु. तेजल विकास पाटील हिने १९२ गुण मिळवून तालुका गुणवत्ता यादीत २ रा क्रमांक मिळविला. 


या सर्व विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक एस. एस मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे , सचिव मानसिंग हाके व सर्व संचालक यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.या सर्व विद्यार्थ्यांना रूपेश कर्पे, सुनिल भोये, शंकर बल्लाळ, ज्ञानेश्वर भगरे, राजीव आरते, प्रल्हाद पाटील, सौ. पौर्णिमा धेंडे, वर्षा चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆