BANNER

The Janshakti News

संस्कार केंद्राच्या माध्यमातून मिळालेले संस्कार भविष्यासाठी जतन करून ठेवा - मकरंद चितळे



======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर               दि. १९ जुलै २०२३

साने गुरुजी संस्कार केंद्राने गेली २३ वर्षे सातत्याने भिलवडी आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या मनावर योग्य संस्काराची पेरणी केली आहे.संस्कार केंद्राच्या माध्यमातून मिळालेले संस्कार भविष्यासाठी जतन करून ठेवा असे प्रतिपादन चितळे उद्योग समुहाचे उद्योजक मकरंद चितळे यांनी केले.
भिलवडी ता.पलूस येथील पू.साने गुरुजी संस्कार केंद्राच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्कार शिष्यवृत्ती वितरण,वाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण,मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.


केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक,संस्कारक्षम व समाज उपयोगी उपक्रमाविषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. 

ह. रा.जोशी यांनी विविध बालकवितांचे सादरीकरण केले.शरद जाधव यांनी मलाही हवयं पुस्तक ही संस्कारक्षम बालकथा सांगून वाचन चळवळीचे महत्त्व सांगितले.
संस्कार कलशाच्या माध्यमातून संकलित झालेल्या निधीतून  प्रथमेश वावरे,मिनाज सलामत,सुयश निकम या विद्यार्थ्यांना संस्कार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.वाचन स्पर्धेमधील रसिका शिंदे,पालवी शेटे,श्रीवर्धन वावरे,सुयश निकम,तनुजा सपकाळ या विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे व श्यामची आई पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. बालावाचक आदित्य माने याचा विशेष सत्कार करण्यात आला. उद्योजक मकरंद चितळे यांच्या हस्ते पुढील वर्षांसाठी संस्कार कलश या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भिलवडी वाचनालयाचे संचालक जयंत केळकर,हणमंत डिसले,महादेवराव जोशी,बाळासाहेब माने,संजय गुरव,शरद जाधव,वामन काटीकर,विद्या निकम, मयुरी नलवडे आदी उपस्थित होते.प्रमोद कुलकर्णी यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


संस्कार शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी मकरंद चितळे,सुभाष कवडे,जयंत केळकर आदी मान्यवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆